निवडणूक खर्च सादर न केल्याचा फटका : यावल तालुक्यातील दोन ग्रामपंचायत सदस्य अपात्र


Impact of non-submission of election expenses : Two Gram Panchayat members of Yaval taluka disqualified यावल : यावल तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी सदस्यांनी वेळेत निवडणूक खर्च सादर न केल्याने त्यांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र घोषित केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सदस्यांनी खर्च सादर न केल्याने दोघांविरुद्ध तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अपात्र करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांनी थोरगव्हाण व म्हैसवाडी या गावातील सदस्यांना मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्याने अपात्र घोषित केले आहे.

खर्च सादर न करणार्‍यांना दणका
यावल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यात थोरगव्हाण ग्रामपंचायतीत शरद श्रीराम चौधरी व म्हैसवाडी ग्रामपंचायतीत मीना कमलाकर चौधरी या विजयी झाल्या मात्र या दोघा विजयी झालेल्या सदस्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला निवडणुकीचा खर्च मुदतीत सादर केला नाही. वारंवार सूचना देऊनही त्यांनी खर्च सादर न केल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांकडे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दोघांच्या संदर्भात अपात्रतेचा प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकारी यांनी या दोघा सदस्यांची सुनावणी घेत कलम 14 ब नुसार अपात्र घोषित केले. जिल्हाधिकार्‍यांनी अशा पद्धतीने निवडणुकीचा खर्च सादर न करणार्‍यांना अपात्र केल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !