रावेर-रसलपूर दरम्यानच्या जुगार अड्डयावर धाड : 13 जुगारी जाळ्यात

पाच लाख 81 हजारांचा मुद्देमाल जप्त : सहा.पोलीस अधीक्षकांच्या पथकाच्या कारवाईने खळबळ


Gambling den raids between Raver-Russell: 13 gambling dens रावेर : आयपीएस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकत 17 हजारांच्या रोकडसह सुमारे पाच लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर 13 जुगार्‍यांविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर-ररसलपूर दरम्यान जुगार खेळणर्‍या पत्ताच्या अड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने छापेमारी केली. पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील व पोलीस कर्मचारी अनिल इंगळे, सुमित बाविस्कर यांनी घटनास्थळावरुन 16 दुचाकी, आठ मोबाईल तसेच 17 हजारांची रोकड जप्त केली.

यांच्यावर झाली कारवाई
जुगारी मुस्तफा तडवी (रमजीपूर), गणेश पवार (अभोडा तांडा), जुबेर रफीक शेख (इमामवाडा, रावेर), फिरोज तडवी (जीन्सी ाभोडा), सलीम तडवी (अभोडा), आदिलखान सलीमखान (इमामवाडा रावेर), समाधान महाजन (रसलपूर), किसन पवार (अभोडा), सतीष शिरतुरे (सिध्दार्थनगर रावेर), अल्ताफ रशीदखान (भोईवाडा, रावेर), सुधाकर महाजन, (जुना सावदा रोड, रावेर), रमजान तडवी (रसलपूर), शुभम महाजन, दिलीप न्हावी यांच्याविरोधात पोलीस हवालदार गणेश मनुरे यांनी रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !