भुसावळ शहरात प्लॉट खरेदीत वयोवृद्धाला 18 लाखांचा गंडा
18 lakhs to an elderly person in the purchase of a plot in Bhusawal city भुसावळ : प्लॉट खरेदी करून देण्याच्या बहाण्याने वयोवृद्धाकडून 18 लाख रुपये लाटण्यात आल्यानंतर प्लॉटची खरेदी देण्यात न आल्याचा प्रकार शहरात घडला. याप्रकरणी सागर शिवदास वानखडे (63, अथांग, इंद्रप्रस्थ नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून संशयीत महेंद्र उर्फ विकी प्रकाश संसारे (साकरी फाटा, वरणगाव रोड, भुसावळ) यांच्याविरोधात शहर पोसिात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
वानखडे यांच्या तक्रारीनुसार, सर्वे क्रमांक 188/1/190/2/अ मधील प्लॉट क्रमांक 79 हा तक्रारदार यांना विक्री करण्याच्या बहाण्याने संशयित विकी संसारे याने 18 लाख रुपये स्वीकारले मात्र प्लॉटची खरेदी करून दिली नाही. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय किशोर पवार करीत आहेत.


