भुसावळात उघड्यावर गांजा सेवन : तिघांना बाजारपेठ पोलिसांकडून अटक


Consumption of ganja in the open in Bhusawal : Three arrested by market police भुसावळ : सार्वजनिक जागी धुम्रपान करणे कायद्याने गुन्हा असतानाही डोक्याला गुंगी आणणार्‍या गांजा चिलीमद्वारे ओढणार्‍या तिघांवर गुरुवार, 22 रोजी बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केल्याने नशेखोरांच्या गोटात खळबळ उडाली. तिघांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

तिघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा
गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता हिरा हॉलच्या बाजूला गांजा ओढणार्‍या सलमान शेख सलीम शेख (20, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) याच्याविरोधात कॉन्स्टेबल भूषण चौधरी यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली. खडका रोडवरील ईदगाहनजीक युनूस हमीद शेख (48, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) हा गांजा ओढत असताना कॉन्स्टेबल अमर अढाळे यांनी कारवाई केली तर तिसर्‍या कारवाईत करीम नूर मोहम्मद शेख (56, उस्मानिया मशिदीजवळ, भुसावळ) यास गांजा ओढताना कॉन्स्टेबल जावेद हकीम शाह यांनी पकडत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !