हॉटेलच्या ढाब्यावरून विद्युत मीटर लांबवले : भुसावळ तालुक्यातील घटना


Electric meter extended from hotel dhaba : incident in Bhusawal taluka भुसावळ : दीपनगर गावाजवळील शेरे पंजाब ढाब्यावरील विद्युत मीटर चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार 21 रोजी फेब्रुवारी रोजी घडला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

वीज मीटरच्या चोरीने आश्चर्य
केरमान स्याम अमरोलीवाला (69, नाजू मेनशन, काशीनाथ लॉजसमोर, यावल रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, दीपनगर गावाजवळील अमरोलीवाला अ‍ॅण्ड सन्स नावाच्या पेट्रोल पंपातील शेरे पंजाब ढाब्याच्या पश्चिमेकडील भिंतीवरील आठ हजार रुपये किंमतीचे विद्युत मीटर अज्ञात चोरट्यांनी 21 रोजी रात्री 12 ते सकाळी सात वाजेदरम्यान लांबवले. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार योगेश पालवे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !