रावेर स्टेशनला पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर रूजू
Police inspector Pradeep Thakur joins Raver station रावेर : रावेर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर नुकतेच रुजू झाले आहेत. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी जळगाव येथील जिल्हा पेठ स्टेशन शहर पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन, पारोळा स्टेशन तसेच अमरावती, मुंबई, खामगाव येथे सेवा बजावली आहे.
संवेदनशील शहरात काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. ठाकूर यांनी सुमारे 31 वर्षे पोलीस खात्यात सेवा बजावली आहे. रावेर पोलीस स्टेशनच्या पदाची सूत्रे त्यांनी हाती घेतली आहेत.


