भुसावळात स्पा सेंटरआड दाम्पत्याकडून सुरू होता वेश्या व्यवसाय : दोन ग्राहक ताब्यात : पाच तरुणींची सुटका
पुणे-नगरच्या तरुणींकडून भुसावळात सुरू होता व्यवसाय : आरोपींविरोधात बाजारपेठ पोलिसात पीटा अॅक्ट अन्वये गुन्हा
Prostitution business started by couple near spa center in Bhusawal : Two customers arrested: Five young women released भुसावळ (3 मार्च 2025) : शहरातील उच्चभू्र समजल्या जाणार्या महेश नगर भागातील एका बंगल्यात चालणार्या वेश्या व्यवसायाचा भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पर्दाफाश केला आहे. रविवार, 3 मार्च रोजी दुपारी वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकत पाच तरुणींची सुटका केली तर दाम्पत्याला अटक करण्यात आली. विशाल शांताराम बर्हाटे व पल्लवी विशाल बर्हाटे (महेश नगर, भुसावळ) अशी अटकेतील दाम्पत्याची नावे असून त्यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात पीटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वात शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण, एएसआय प्रदीप पाटील, एएसआय शालिनी वलके, हवालदार नंदकिशोर सोनवणे, शिपाई अश्विनी जोगी आदींच्या पथकाने केली.

दोन महिन्यांपासून पोलिसांची पाळत
भुसावळातील महेश नगरातील बर्हाटे दाम्पत्य फोनवरूनच वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालवत होते. त्यासाठी पुण्यासह, अहमदनगर, कोल्हापूर भागातील गरजू तरुणींशी फोनद्वारे संपर्क साधल्यानंतर या तरुणी शुक्रवारी ट्रेनने भुसावळात येत होत्या व शनिवार, रविवार या दिवशी वेश्या व्यवसाय जोमात चालत होता. महेश नगरातील बंगल्यातच चालणार्या वेश्या व्यवसायाची माहिती पोलीस उपअधीक्षक पिंगळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी खबर्यांचे नेटवर्क अॅक्टीवेट केले. दाम्पत्य फोनवरून वेश्या व्यवसायाची डिलींग करीत असल्याने बनावट ग्राहक पाठवल्यानंतर त्याने रविवारी दुपारी इशारा करताच पोलिसांनी धाड टाकली.
पाच तरुणींची सुटका
पोलिसांनी पाच तरुणींची सुटका केली आहे तर बर्हाटे दाम्पत्याला अटक केली आहे. महेश नगरातील उच्चभू्र वसाहतीत या दाम्पत्याचा बंगला असून त्यातच गेल्या काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे कळताच नागरीकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच तरुणींमध्ये चार तरुणी या पुणे, अहमदनगर, कोल्हापूर भागातील रहिवासी आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या भुसावळात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
