बोदवड तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग : आरोपीला एक वर्ष शिक्षा
molestation of minor girl in Bodwad taluka: Accused gets one year sentence भुसावळ : बोदवड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करीत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीला भुसावळ सत्र न्यायालयाने एक वर्ष शिक्षा व अडीच हजारांचा दंड सुनावला.
असे आहे प्रकरण
1 ऑक्टोबर 2021 रोजी बोदवड तालुक्यातील एका गावात आरोपी विशाल धोंडू माळेकर (29) याने अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करीत तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी बोदवड पोलिसात पोस्को व विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. सरकार पक्षाने आठ साक्षीदार तपासले. त्यात पिडीता, तिची आई, तपास अधिकारी तथा उपनिरीक्षक शरद माळी तसेच गुनहा दाखल अंमलदार हवालदार गजानन काळे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड.मोहन देशपांडे यांनी या खटल्यात प्रभावी युक्तीवाद केल्यानंतर तो न्यायालयाने ग्राह्य धरत आरोपी विशाल माळेकर याला कलम 354 अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पिडीत बालिकेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक भीमदास हिरे यांनी काम पाहिले.

