शिरागडला तापी नदी पात्रात बुडाल्याने 58 वर्षीय इसमाचा मृत्यू
58-year-old Isma died after drowning in the Tapi River at Shiragad यावल : यावल तालुक्यातील शिरागड येथील तापी नदी पात्रात पाय घसरून पाण्यात बुडून 58 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या या इसमाचा मृतदेह दुसर्या दिवशी मिळून आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शिरागड, ता.यावल या गावाजवळील तापी नदीच्या पात्रात कैलास मोतीराम सोनवणे (58, रा.आवार, ता.जळगाव) पाय घसरून बुडाला. दुसर्या दिवशी तापी नदी पात्रातून त्याचा मृतदेह काढण्यात आला. यावल ग्रामीण रुग्णालयात आणुन त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.

