निंभोरा येथे हॉटेल मॅनेजरवर हल्ला : भुसावळातील राजकुमार खरातला अटक
Attack on hotel manager in Nimbhora : Rajkumar Kharat from Bhusawal arrested भुसावळ : भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथील हॉटेल त्रिमूूर्ती येथे जेवण व दारूच बिल मागितल्यानंतर हॉटेल मॅनेजरवरच धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवार, 27 मार्च रोजी रात्री आठ वाजता घडली आहे. याप्रकरणी राजकुमार रवींद्र खरात (भुसावळ) याच्याविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
बिल मागितल्याच्या रागातून हल्ला
भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथील हॉटेल त्रिमूर्तीवर संशयीत राजकुमार रवींद्र खरात (समता नगर, भुसावळ) हा त्याच्या मित्रांसोबत जेवण व दारू पिण्यासाठी बुधवारी रात्री आठ वाजता आला. जेवनानंतर जेवणासह दारूचे पैसे हॉटेल मॅनेजर धरमदास जीवनलाल चौधरी (साकरी फाटा, वरणगाव रोड, भुसावळ) यांनी मागितले असता संशयितानी शिविगाळ करीत दमदाटी केली तसेच काउंटरच्या बाजूला असलेले मंदिर फेकून दिले व आरोपीने काहीतरी धारदार वस्तूने तक्रारदाराच्या उजव्या हातावर मारून दुखापत केली.

याप्रकरणी अभिषेक शेखर पुरुषोत्तमवार (22, उर्दू हायस्कूलजवळ, भुसावळ) यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री 12.30 वाजता तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी राजकुमार खरात (समता नगर, भुसावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हवालदार योगेश पालवे करीत आहे.




