भुसावळात शॉर्टसर्किटमुळे झुडूपांना लागली आग
Shrubs caught fire due to short circuit in Bhusawal भुसावळ : महावितरणच्या सर्व्हिस केबलमध्ये शॉर्टसर्किट होऊन मोकळ्या जागेतील झूडूपांना आग लागल्याची घटना शहरातील कंडारी परिसरातील डॉ. आंबेडकर नगरात शुक्रवारी दुपारी घडली. सुदैवाने ही आग परिसरातील घरापर्यंत पोहोचली नाही.
वेळीच आगीवर मिळाले नियंत्रण
पालिकेच्या अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच काही वेळेत बंब दाखल झाला व आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान या भागातील अरुंद रस्त्याचा अडथळ्यामुळे बंबाला फेर्याच्या रस्त्याने जावून आगीचे घटनास्थळ गाठावे लागले. शहरात तापमानाच्या वाढीमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी दुपारी आंबेडकर नगरातील ओपन प्लॉटमधून गेलेल्या महावितरणच्या सर्व्हिस केबलमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. यामुळे ओपन प्लॉटवर वाढलेल्या झाडे झुडपांनी पेट घेतला. मोकळ्या प्लॉटच्या चहूबाजूंनी वस्ती असल्याने या घरांना आग लागण्याचा धोका होता मात्र सुदैवाने आग वेळीच आणण्यात यंत्रणेला यश आले.

