वरणगावात घरातून मोबाईलसह रोकड लांबवली : आरोपीला अटक


Cash stolen from house with mobile phone in Warangaon : Accused arrested वरणगाव : वरणगाव शहरातील एका घरातून रात्रीच्या वेळेस मोबाईल व रोख रक्कम चोरी करणार्‍या आरोपीस वरणगाव पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकल्या आहेत. विशाल उर्फ गोलू माळी (भवानीनगर, वरणगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

सीसीटीव्ही फुटेजद्वारा आरोपी जाळ्यात
वरणगाव शहरातील गांधी चौकातील बंडू संपत चौधरी यांच्या घरातून शुक्रवार, 29 रोजी रात्री दोन वाजेच्या वाजेच्या सुमारास दरवाजा उघडा असतांना चोरट्याने सॅमसंग कंपनीचा मोबाईल व पंधराशे रुपये लंपास केले होते. बंडू चौधरी यांच्या लक्षात हा प्रकार आला मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटा पसार झाला. वरणगाव पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल अतुल बोदडे, पराग दुसाने, सुकराम सावकारे, ईश्वर तायडे यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे विशाल उर्फ गोलू माळी (भवानीनगर, वरणगाव) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून सॅमसंग कंपनीचा मोबाईल व पंधराशे रुपये हस्तगत करण्यात आले. तपास सहाय्यक फौजदार नाग्रेंद्र तायडे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !