अट्रावलला नदीपात्रात जुगाराचा डाव उधळला : आठ जुगारी जाळ्यात


Gambling scam busted in Atravala riverbed: Eight gamblers in net यावल : यावल तालुक्यातील अट्रावल येथे पोलीस पथकाने रंगात आलेल्या जुगाराच्या डावावर छापेमारी करीत आठ जुगार्‍यांना ताब्यात घेतले तर रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण दोन लाख 20 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे जुगारींच्या गोटात खळबळ उडाली.

कारवाईने जुगारी हादरले
अट्रावल, ता.यावल या गावाजवळ इंजाळ नदीचे पात्र आहे. येथे झाडाझुडूपात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाली. त्यांनी पथकासह त्या ठिकाणी जाऊन छापा टाकण्याच्या सुचना केल्या. पथकाने इंजाळ नदीपात्र गाठले असता तेथे प्रदीप रवींद्र भालेराव, विशाल लीलाधर तायडे, चंद्रशेखर रघुनाथ कोळी, चेतन प्रकाश पाटील, अर्जुन वसंत भिल, सुनील इंधाटे, अजय सोनवणे हे आठ जण जुगार खेळतांना आढळल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले तर रोख रक्कमेसह चार मोटरसायकली असा एकूण दोन लाख 20 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी, सुशील घुगे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवालदार सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !