अहिरवाडी वनक्षेत्रात डिंकाची अवैध वाहतूक रोखली : 27 हजारांचा मुद्देमाल जप्त


Illegal traffic of gum stopped in Ahirwadi forest area : 27 thousand seized रावेर  : सातपुड्यातील अहिरवाडी वनक्षेत्रात अवैधरित्या सलई डिंकाची वाहतूक करीत असतांना दुचाकी पकडण्यात आली मात्र अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाला. दुचाकीसह डिंक मिळून सुमारे 27 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गस्तीदरम्यान पथकाची कारवाई
रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार रावेर वनक्षेत्रातील अहिरवाडी नियतक्षेत्र पडल्यामधील कं. नं. 03 मध्ये गस्तीदरम्यान दुचाकी (एम.पी.12 बी.ए.7202) द्वारे संशयीत अवैधरित्या सलाई डिंकाची वाहतूक करतांना आढळला. सुमारे वीस किलो सलई डिंक जप्त करण्यात आला तर अंधाराचा फायदा घेत संशयीत पसार झाला. सुमारे अडीच हजार रुपये किंमतीचा डिंक तर 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आाला.



ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अजय बावणे, वनपाल राजेंद्र सरदार, वनरक्षक सुपडू सपकाळे, वनरक्षक रमेश भुतेकर आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !