भाजपासोबत होणार टफ फाईट : जळगावात उद्धव ठाकरे गटाकडून माजी नगराध्यक्ष करण पवारांना उमेदवारी


Tough fight with BJP : Uddhav Thackeray group nominates former mayor Karan Pawar in Jalgaon मुंबई : जळगाव लोकसभेसाठी उबाटा गटाचे उमेदवार म्हणून पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या नावाची उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्रीवर घोषणा केली. पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार व भाजपाच्या स्मिता वाघ या उमेदवारांमध्ये आता अत्यंत चुरशीचा सामना होणार आहे. जळगाव लोकसभेसाठी अनेक उमेदवारांच्या नावांची सुरूवातीला चर्चा होती मात्र उबाटा गटाचा उमेदवार निश्चित होत नव्हता मात्र बुधवारी भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील व माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर करण पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

खासदार उन्मेष पाटील यांच्या हाती शिवबंधन
उन्मेष पाटील यांच्यासह पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार व विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुंबईत बुधवारी दुपारी हातावर शिवबंधनप बांधत उबाटा गटात प्रवेश केला. खासदार उन्मेष पाटील भाजपाने उमेदवारी कापल्याने अत्यतं नाराज असल्याने त्यांनी बुधवारी ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल होत हाती मशाल घेतली आहे.

उत्तर महाराष्ट्राला मिळाली ताकद : खासदार संजय राऊत
खासदार संजय राऊत म्हणाले की, खासदार उन्मेष पाटील व करण पवार यांच्यासोबत सगळे कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. उन्मेष पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पारोळा नगराध्यक्ष करण पवार सुद्धा सेनेत दाखल झालेत. उन्मेष पाटील निष्ठावंत भाजप कार्यकर्ते होते, पण तिथे निष्ठावंताची कदर नाही, म्हणून ते निष्ठावंत्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात आता शिवसेनेला ताकद मिळणार असून निवडणूक नुसतीच रंगतदार होणार नाही तर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे.


कॉपी करू नका.