भुसावळ रेल्वे स्थानकावरील आरपीएफ निरीक्षकांवर हल्ला : आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी

Attack on RPF inspectors at Bhusawal railway station : Accused sent to police custody भुसावळ : भुसावळातील प्लॅटफार्म क्रमांक पाचरवरील मद्रास बेकरी या नवीन स्टॉलवर विक्रेत्यांमध्ये जोरदार वाद झाल्यानंतर भुसावळ रेल्वे स्थानक निरीक्षक आर.के.मीना व सहकारी महेंद्र कुशवाह यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी 14 संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करीत नऊ आरोपींना अटक केली होती. संशयीतांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या आरोपींना झाली अटक
अधिकार्यांवर हल्ला केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयीत शेख सद्दाम शेख बशीर, मुझफ्फर सय्यद लियाकत अली, आझाद शेख बशीर, शेख समीर शेख हमीद, कासिम हमीद सय्यद, शेख इरफान शेख चाँद, शेख सलमान शेख बशीर, रियाज मोहंम्मद अब्दुल रहेमान, अफसर रफिक मेमन उर्फ गुड्डू यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने आरोपींना एका दिवसांची अर्थात 4 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब मगरे करीत आहेत.


