14 लाखांचा बिअर साठा नंदुरबारातून जप्त


नंदुरबार : 14 लाख 32 हजार रुपये किंमतीचा व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधक असलेला परराज्यातील बिअरचा साठा जप्त करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली. नंदुरबार येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. 26 फेब्रुवारीच्या रात्री अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय परदेशी, दुय्यम निरीक्षक शैलेंद्र मराठे यांचे पथक गस्तीवर होते. यावेळी नंदुरबार नवापूर रस्त्यावरील खामगावच्या शिवारात कंटेनर संशयीतरित्या जात असताना त्याची तपासणी करण्यात आली असता त्यात विविध प्रकारच्या बिअरचा मोठा साठा आढळला. या प्रकरणी राजस्थान मधील पुष्पेंद्रसिंह प्रभू सिंह चौहान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !