एलटीटी ते वाराणसीदरम्यान विशेष गाडी धावणार : प्रवाशांची होणार सोय

भुसावळ : रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होत असलेली गर्दी पाहता प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून एलटीटी ते वाराणशी या मार्गावर विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आल आहे. यामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांना सुविधा मिळणार आहे.
04229 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शुक्रवार, 14 जूनला दुपारी एक वाजता सुटणार आहे. ही गाडी वाराणशीला दुसर्या दिवशी रात्री 11.45 वाजता पोहोचेल. या गाडीची एक फेरी होणार आहे तर वाराणशी (04230) येथून ही गाडी बुधवार, 12 जूनला रात्री 10.20 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी सकाळी 10.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचणार आहे.
या गाडीची एक फेरी होणार आहे. ही गाडी ठाणे, कल्याण, नासिक रोड, भुसावल, खंडवा, इटारसी, भोपाल, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओराई, कानपूर, लखनऊ, अयोध्या कैंट, अयोध्या, शाहगंज आणि जौनपूर येथे थांबणार आहे. या गाडीला 24 डबे असतील. प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


