यावलला व्यास मंदिरात दर्शनार्थ भाविकांची मांदियाळी
यावल : यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात रविवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत श्री महर्षी व्यासांची महापूजा करण्यात आली. पूजेचा मान दर्शना व सनी पेडणेकर (मुंबई), दीपाली व भगतसिंग पाटील, सुरेखा व नामदेव बारी, नयना व हेमंत बारी या दाम्पत्याला देण्यात आला. मंदिरातील संपूर्ण धार्मिक विधी मंदिराचे पुजारी रघुनाथ बावीसे महाराज, अतुल बाविसे, मनीष बैरागी, त्रिभुवन बैरागी, गोपाळ बैरागी, सारंग बाविसे, महेश बयाणी, राजु बयानी, मोरेश्वर बयाणी, अर्थव बयाणी, निखील वैद्य, भूषण कुककर्णी, प्रथमेश बयाणी, निशिकांत ताबोळी, हेमंत मुळे, सोनु नाईक, भूषण बैरागी या ब्रम्हवृंदानी पार पाडली व नंतर भाविक भक्तांकरीता गाभारा दशर्नाकरीता उघडण्यात आला.
भाविकांना प्रसादाचे वितरण
आलेल्या भाविक भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. येथे 11 क्विंटलची बुंदी व 21 क्विंटल तांदूळाचा तिखट भाताचा महाप्रसाद काळा हनुमान मित्र मंडळाच्या वमतीने हजारो भाविकांना वितरित करण्यात आला. तसेच गुरू पौर्णिमेनिमित्ताने येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 11 दात्यांनी रक्तदान केले. भाविकांना दर्शनार्थ अडचणी येवू नये याकरीता सुमारे 100 स्वयंसेवक तथा यावल पोलिसांनी बंदोबस्त राखला.

सर सत्यजित राम नेमाडे विद्यालय, बोदवड
बोदवड : राष्ट्रीय शिक्षण संस्था बोदवड संचलित, सर सत्यजित राम नेमाडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य गुरू महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक आर.टी.बडगुजर व ज्येष्ठ शिक्षक आर.जी.हजारी व एस.पी.मंगळकर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गुरूचे जीवनात किती व कसे महत्त्व आहे याबाबत बारावी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी उपासना पाटील हिने माहिती दिली. आभार दीपिका साळुंके हिने मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.




