भुसावळात इनरव्हील क्लब ऑफ रेल सिटीतर्फे स्कूल बॅग वाटप


भुसावळ : भुसावळ इनरव्हील क्लब ऑफ रेल सिटीतर्फे शहरातील म्युन्सील हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, इनरव्हील क्लब अध्यक्षा मीनाक्षी धांडे, सचिव किरण जावळे, विना झंवर, छाया बर्‍हाटे, राधा राठोड, शीतल भराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रोजेक्ट चेअरमन सुनीता पाचपांडे संध्या धांडे, मृणाल पाटील, मेघा वाणी, योगीता वायकोळे, कविता पाचपांडे, अनिता महाजन, पल्लवी मुळे, रंजना यावलकर, नीता अहिराव आदींची उपस्थिती होती. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. नगरपरिषद संचलित म्युन्सिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष मेढे यांनी सहकार्य केले. प्रदीप साखरे यांनी सूत्रसंचालन केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !