भुसावळातील महिला बॉक्सर अद्वितीया श्रीवास्तवने मारली राज्यस्तरीय स्पर्धेत बाजी


भुसावळ : शहरातील छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमीची विद्यार्थिनी बॉक्सर अद्वितीया श्रीवास्तव हिने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये केंद्रीय विद्यालय संघटन, मुंबई विभाग रिजनल स्पोर्ट्स बॉक्सिंग स्पर्धेमध्ये अंजिक्यपद पटकावले. या विद्यार्थिनीची निवड आता राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी झाली आहे. महिला बॉक्सर अद्वितीया श्रीवास्तव हिने मिळविलेल्या यशामुळे भुसावळचा नावलौकीक राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.

भुसावळचा वाढवला नावलौकीक
बॉक्सर अद्वितीया श्रीवास्तव हिचा सामना प्रथम देवलाली येथील केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थिनी सोबत झाला. या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये प्रतिस्पर्धीला पराभूत करून ती अंतिम लढतीत पोहोचली. अंतीम लढत पुणे केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थिनी ममता हिच्यावर विजय मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले. या लढतीत मिळवलेल्या यशानंतर अद्वितीया श्रीवास्तव हिची केंद्रीय विद्यालय नॅशनलसाठी निवड झाली. अद्वितीया श्रीवास्तव हिला एन.आय.एस. बॉक्सिंग कोच नरेंद्र अरुण मोरे व तसेच प्रशिक्षक धीरज सोनवणे, नीतेश तायडे, समाधान बाविस्कर,गणेश वाघोदे आदींचे मार्गदर्शन लाभले. मुलांसोबतच मुलींनाही बॉक्सींग स्पर्धेत निपूण करुन राष्ट्रीय पातळीवर भुसावळचा नावलौकीक वाढावा यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे प्रशिक्षक नरेंद्र मोरे म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !