फैजपूर पोलीस ठाण्याचा रामेश्वर मोताळे यांनी स्वीकारला पदभार
फैजपूर : फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये सहा.पोलीस निरीक्षक म्हणून नशिराबादचे रामेश्वर दगडू मोताळे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला.
फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश नानाजी वाघ यांची तांत्रिक कारणास्तव नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर मोताळे यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नियुक्ती केली. फैजपूर शहरातील सट्टा, पत्ता, अवैध दारू, गुटखा अन्य अवैध धंदे रोखण्यासह वाढती गुंडगिरी थांबवण्याचे आव्हान सहा.निरीक्षक मोताळे यांच्यापुढे आहे.

