मनमाड स्थानकावर अनधिकृत खाद्य विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई
Action taken against unauthorized food vendors at Manmad station भुसावळ : भुसावळ विभागातील मनमाड स्थानकावर वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा बलाने अनधिकृतरित्या प्लॅटफॉर्म तसेच रेल्वे गाड्यांमध्ये खाद्य पदार्थ विक्री करणार्या विक्रेत्यांसह रेल्वे परिसरात अनधिकृत पार्किंग करणार्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईने अनधिकृतरित्या खाद्य पदार्थ विक्री करणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
सात महिन्यात 1373 विक्रेत्यांवर कारवाई
जानेवारी 2024 ते जुलै 2024 या महिन्यात एकूण एक हजार 373 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून एकूण 16 लाख 60 हजार 422 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वेच्या आवारात किंवा गाड्यांमध्ये अनधिकृतपणे विक्री करणार्या किंवा विनाकारण गाड्यांमध्ये साखळी ओढणार्या कोणत्याही व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

