बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेेंचे गंभीर आरोप : माजी गृहमंत्री तर…!


मुंबई : मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक असे आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, असे सचिन वाझे यांनी म्हटल्यानंतर खळबळ उडाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्यावर दबाव आणून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकणार होते, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी अलीकडेच केला होता.

बडतर्फ अधिकार्‍याचे गंभीरा आरोप
मुंबई पोलीस दलातून बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप करताना देशमुख हे पैसे घेण्याचे सीबीआयकडे पुरावे आहे व देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा आरोप त्यांनी केला आहे.


एएनआयला दिली प्रतिक्रिया
अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या तुरुंगात आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणार्‍या अनिल देशमुखांना सचिन वाझेने अडचणीत आलं आहे. सचिन वाझेनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सचिन वाझेला रुग्णालयात नेत असताना त्याने ‘एएनआय’ला दिलेल्या प्रतिक्रियेत देशमुखांवर गंभीर आरोप केले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !