वड्री गावात दोन शालेय विद्यार्थिनींना कुत्र्यांनी घेतला चावा
यावल (5 ऑगस्ट 2024) : यावल तालुक्यातील वड्री येथे शनिवारी शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या दोन विद्यार्थिनींना कुत्र्याने चावा घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी कुत्र्याच्या तावडीतून या विद्यार्थिनींना सोडवले आणि यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ हलवले. येथे त्यांच्या उपचार करण्यात आले. गावातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मोकाट कुत्र्यांची भीती
वड्री, ता.यावल येथे शाळा सुटल्यानंतर रेहाना बशीर तडवी (13) व तनुजा नसीर तडवी (8) या दोघी विद्यार्थिनी घरी जात असताना रस्त्यात एका मोकाट कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करीत चावा घेतला. नागरिकांनी कुत्र्याच्या तावडीतून या दोन्ही बालिकांना सोडवले व सरपंच अजय भालेराव, ग्रामसेवक मजित तडवी, बशीर परमान तडवीसह नागरिकांनी दोघा बालिकांना उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, डॉ.कोमल नरवाडे. अधिपरीचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, प्रियतमा पाटील, अमोल अडकमोल आदींनी या बालिकांवर उपचार केले. दरम्यान, वड्री गावात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली असून विद्यार्थ्यांमध्ये भीती पसरली आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

