ऑलिम्पिकमधून बाद ठरवताच विनेश फोगाटची प्रकृती खालावली
Vinesh Phogat’s health deteriorated as soon as he was ruled out of the Olympics नवी दिल्ली (7 ऑगस्ट 2024) : ऑलिम्पिकमधून बाद ठरवण्यात आल्यानंतर विनेश फोगाटची प्रकृती खालावली असून ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर पॅरीसमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वजनी गटाच्या मर्यादेपेक्षा किंचीत अधिक वजन आढळल्याने विनेशला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आल्यानंतर हातातोंडाशी आलेलं पदक हुकताच मोठा धक्का विनेशला बसला आहे.
रुग्णालयात उपचार
उपांत्य लढतीनंतर वजन किंचीत वाढलं असल्याचं लक्षात आल्यानंतर विनेश हिने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत बसली मात्र आज सकाळी वजन करण्यात आलं. तेव्हा तिचं वजन हे निश्चित मर्यादेपेक्षा किंचित अधिक भरलं. त्यामुळे समितीने तिला स्पर्धेतून बाद करण्याचा निर्णय सुनावला. या निर्णयाचा मोठा धक्का विनेशला बसल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, बेशुद्ध झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.


अंतिम फेरीत मारली होती मुसंडी
पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या 50 किलो वजनी गटामध्ये भारताच्या विनेश फोगाट हिने मंगळवारी दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत मुसंडी मारली होती. सलामीच्या सामन्यात विनेश फोगाटने ऐतिहासिक कामगिरी करतावना जपानची दिग्गज खेळाडू सुसाकी विरूद्ध विजय मिळवला होता. त्यानंतर विनेशने उपांत्यपूर्व सामन्यात सामन्यात युक्रेनची प्रतिस्पर्धी ओक्साना लिवाच हिचा पराभव केला. तर उपांत्य सामन्यात विनेशने क्यूबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुजमैनला 5-0 नं दारुण पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली होती. अंतिम सामन्यात विनेशची गाठ अमेरिकन महिला कुस्तीपटू एस. हिल्डब्रांट्स हिच्याविरुद्द होणार होता. मात्र तत्पूर्वीच तिला अपात्र ठरवण्यात आलं.







