सातपुड्यातील कृतज्ञता यात्रेत ग्रामस्थांनी मांडल्या समस्या

धनंजय चौधरी यांनी प्रश्न जाणून घेत समस्या सोडवण्याची दिली ग्वाही


Problems raised by the villagers during the Gratitude Yatra in Satpura रावेर (8 ऑगस्ट 2024) : एनएसयूआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी यांच्या कृतज्ञता यात्रेच्या चौथ्या दिवशी मंगळवारी सातपुड्यातील आभोडा बुद्रुक, आभोडा खुर्द, जुनोने, मंगरूळ आणि पिंपरी या गावांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. रावेर-पाल रस्ता आणि पुलाचे काम पावसामुळे बंद असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. अभोडा येथे युवकांनी वाचनालय व व्यायामशाळेची ही आवश्यकता धनंजय चौधरींकडे ग्रामस्थांनी मांडली. मंगरूळ या गावाचा पेसामध्ये समावेश व्हावा अशी अपेक्षाही तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.

अभोडा येथे जलपूजन
मंगरूळ-केर्‍हाळा या रस्त्याच्या उर्वरित भागाचे कामही तातडीने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी या गावांतील महिलांसाठी प्रशिक्षण आणि व्यवसाय मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यात डॉ.नीलम पाटील, डॉ.अलका पाटील, विजय कोळी, भाग्यश्री पाटील, हसीना तडवी यांनी व्यवसाय मार्गदर्शन केले. अभोडा येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी त्या-त्या गावातील ज्येष्ठ व दिवंगत नागरिकांच्या नावाने वृक्षारोपण करण्यात आले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !