जळगाव जि.प.च्या लाचखोर वरिष्ठ लिपिकाच्या घरातून आठ लाखांची रोकड जप्त ः न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी


Cash of eight lakhs seized from the house of corrupt senior clerk of Jalgaon Z.P. : Court orders police custody जळगाव (22 ऑगस्ट 2024) : एक लाख 80 हजारांची लाच घेताना जळगाव जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिकाला जळगाव एसीबीने अटक केली होती. बुधवार, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरा हा सापळा यशस्वी करण्यात आला. नरेंद्र किशोर खाचणे (52, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. एसीबीच्या कारवाईने खाचणे यांच्या घराची झडती घेतली असता त्यात आठ लाखांपेक्षा अधिक रोकड सापडल्याने ती जप्त करण्यात आली तर खाचणे यांना गुरुवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची अर्थात 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दोन लाखांची मागितली लाच
26 वर्षीय तक्रारदार सावखेडासीम प्राथमिक आरोग्य केंद्र, यावल येथे शिपाई पदावर कार्यरत होते मात्र त्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर रावेर पंचायत समितीत बदली करण्यात आली व बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी वरिष्ठ लिपिक नरेंद्र किशोर खाचणे (52) यांनी 21 ऑगस्ट रोजी दोन लाख रुपयांची लाच मागितली व एक लाख 80 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. खाचणे यांनी पंचासमक्ष तडजोडीअंती एक लाख 80 हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, फौजदार दिनेशसिंग पाटील, हवालदार सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला कॉन्स्टेबल शैला धनगर, पोलीस नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर, नाईक किशोर महाजन, नाईक सुनील वानखेडे, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल अमोल सुर्यवंशी, कॉन्स्टेबल सचिन चाटे आदींनी ही कारवाई केली.

घरात सापडली आठ लाखांची रोकड
खाचणे यांच्या घरात बुधवारी एसीबीने रात्री झडती घेतली असता आठ लाखांपेक्षा अधिक रोख रक्कम सापडल्याने ती जप्त करण्यात आली. खाचणे यांना गुरुवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे करीत आहेत.

 


कॉपी करू नका.