भुसावळ तालुक्यातील भाविकांची बस नेपाळात नदीत कोसळली : 27 भाविकांचा मृत्यू


Nepal Bus Accident भुसावळ (23 ऑगस्ट 2024)  :  नेपाळ दर्शनासाठी निघालेल्या वरणगावसह-तळवेल परिसरातील भाविकांची बस युपीच्या नेपाळमध्ये नदीत कोसळल्याने 27 प्रवाशांना जलसमाधी मिळाली तर या अपघातात  16 प्रवासी गंभीर जखमी असून काही नदीच्या प्रवाहात वाहिल्याची भीती आहे. शुक्रवार, 23 ऑगस्ट सकाळी 11.30 वाजता हा अपघात मर्स्यांगडी अंबुखैरेनीजवळ घडला. भाविक पोखराहून काठमांडूला जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस नदीत कोसळली. स्थानिक पोलीस आणि बचाव पथकानी मृतांसह जखमींना नदीपात्रातून बाहेर काढले.
भाविकांच्या बसला अपघात
भुसावळ तालुक्यातील वरणगावसह तळवेल परिसरातील 110 भाविक नेपाळ दर्शनासाठी 15 ऑगस्ट रोजी रवाना झाले होते. भाविक प्रयागराजपर्यंत ट्रेनने गेल्यानंतर तेथून त्यांनी गोरखपूरच्या केसरवाणी टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बस बुक केल्या होत्या. शुक्रवारी सकाळी 43 भाविक बस (क्रमांक यु.पी.53 एफ.टी.7623) ही पोखराकडून काठमांडू जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने नदीत कोसळली. या अपघातात बसचा चालक मूर्तिजा आणि वाहक रामजीतसह 14 भाविकांचा मृत्यू झाला. बस जिथे कोसळली ते ठिकाण डोंगराच्या खाली असल्याने बचावकार्यात अडचणी आल्या.
जिल्ह्यातील तिघा मंत्र्यांनी जाणली माहिती
पुनर्वसन विभागाचे अधिकारी हे जळगाव जिल्हाधिकारी, उत्तर प्रदेश मदत आयुक्त (रिलीफ कमिश्नर) यांच्या संपर्कात असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली तर मंत्री गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे यांनीदेखील माहिती जाणून घेत युपी प्रशासनाशी संवाद साधला.

कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न
अपघातग्रस्त बसमधील 27 प्रवाशांचा मृत्यू झाला तर त्यातील 16 गंभीर प्रवाशांवर उपचार सुरू आहे तसेच अन्य प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. नेपाळ दूतावासातील अधिकार्‍यांशी संपर्क साधला जात असून पर्यटकांची माहिती मिळाल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जाईल, असे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. नदीत बस पडल्याने बचावकार्य आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.

घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
या घटनेचा व्हिडिओचा समोर आला आहे. व्हिडिओमध्ये बसचा अक्षरशः चक्काचूर झाला असून बस कोसळली त्यावेळी नदीतील पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याचं पाहायला मिळतं.






आमदारांच्या संपर्क कार्यालयात गर्दी
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना कार्यकर्त्यांनी घटना कळवल्यानंतर भुसावळ ग्रामीणमधील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. आमदारांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधून अपघाताची माहिती त्यांना कळवली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !