नेपाळ दुर्घटनेतील बस अपघाताबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहिती
मुंबई (23 ऑगस्ट 2024) : महाराष्ट्रातील भाविकांची बस नेपाळमध्ये दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत भुसावळ तालुक्यातील 27 भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्टीट करीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे तसेच जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थनादेखील केली आहे.





प्रशासनाला समन्वय साधण्याच्या सूचना
फडणवीस यांनी आपल्या ट्टिटमध्ये म्हटले आहे की, राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असून जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात आहेत. एक प्रांत आणि पोलिस उपअधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे, यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत. नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत.
Nepal bus accident: "Death toll rises to 27 in the bus accident," says Chief District Officer of Tanahun, Janardan Gautam
— ANI (@ANI) August 23, 2024
