नेपाळ बस अपघातातील जखमींची मंत्री रक्षा खडसेंसह आमदार सावकारे यांनी घेतली भेट


Minister Raksha Khadse along with MLA Savkare met the injured in the Nepal bus accident भुसावळ (24 ऑगस्ट 2024) : नेपाळ दर्शनासाठी निघालेल्या वरणगावसह-तळवेल परिसरातील पर्यटकांची बस नेपाळच्या तनहून जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळल्याने 27 पर्यटकांचा मृत्यू ओढवला होता. या भीषण अपघातात 16 प्रवासी गंभीर जखमी होते. शुक्रवार, 23 ऑगस्ट सकाळी 11.30 वाजता हा अपघात मर्स्यांगडी अंबुखैरेनीजवळ घडला होता. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मंत्री रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे हे काठमांडू येथे शनिवारी सकाळी दाखल झाले. लोकप्रतिनिधींनी नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांच्यासह बस अपघातातील जखमींची भेट घेत त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

परराष्ट्र मंत्रालय सचिवांशी चर्चा
नेपाळमध्ये झालेल्या बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे हे शनिवारी सकाळी काठमांडू येथे विमानाने दाखल झाले. यावेळी भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव व नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव ब्रिघू ढुंगाना यांच्यासोबत बचाव कार्य आणि पुढील कारवाईबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व आमदार सावकारे यांनी नेपाळ येथील बस अपघात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांची त्रिभुवन युनिव्हर्सिटी टिचिंग हॉस्पिटल, काठमांडू येथे भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान त्यांनी जखमींशी संवाद साधला व उपचाराबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, मुरलीधर पाटील, अतुल झांबरे, केदार ओक आदींची उपस्थिती होती.






प्रशासनाला समन्वय साधण्याच्या सूचना : फडणवीस
फडणवीस यांनी आपल्या ट्टिटमध्ये म्हटले आहे की, राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असून जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्‍यांशी सातत्याने संपर्कात आहेत. एक प्रांत आणि पोलिस उपअधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे, यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत. नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !