एरंडोलला पत्त्याच्या क्लबवर धाड : आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

Raid on Erandol address club : Case registered against eight persons एरंडोल (10 सप्टेंबर 2024) : राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मयुरी गार्डनजवळ सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर नाशिक आयजींच्या विशेष पथकाने धाड टाकत एक लाख 31 हजार 140 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले. याबाबत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
विशेष पथकाची धाड
विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे यांच्यासह हवालदार प्रमोद मंडलिक, सुरेश टोंगारे, विजय बिलघे, तुषार पाटील, विक्रांत मांगडे, स्वप्निल माळी यांनी पारोळ्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, हवालदार हिरालाल पाटील, अभिजीत पाटील, अनिल राठोड, आकाश माळी यांच्या मदतीने सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास क्लबवर छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले.
आठ जणांविरोधात गुन्हा
पोलीस पथकाने टाकलेल्या धाडीत एक लाख 31 हजार 140 रुपये रोख तसेच मोबाईल व जुगाराचे साहित्य जप्त केले.पोलीस पथकाने धाड टाकताच अन्य काही जण भिंतीवरून उड्या मारून पसार झाले. हवालदार प्रमोद मंडलिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून क्लब चालकासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जमावाला पांगवले
पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, सहाय्यक निरीक्षक शंकर पवार, उपनिरीक्षक शरद बागल, विकास देशमुख, विलास पाटील, काशीनाथ पाटील, संतोष चौधरी, दीपक पाटील, दीपक अहिरे, पंकज पाटील यांनी जमावास पांगवले.


