डांभूर्णीत अवैध वाळू वाहतूक : वाहन मालकास दंडाची नोटीस

0

यावल (15 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील डांभूर्णी गावातील मुख्य चौकात एका वाहनाद्वारे अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असताना महसूलच्या गस्ती पथकाने वाळू वाहतुकीचा परवाना मागितला मात्र त्यांच्याकडे परवाना नसल्याने पंचनामा करून वाहन जप्त करण्यात आले. वाहन मालकाला शनिवारी दंडाची नोटीस बजावण्यात आली.

अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर
डांभूर्णी, ता.यावल गावातील मुख्य चौकातून वाहन (क्रमांक एम.एच.05 बी.एच. 7806) मध्ये अर्धा ब्रास वाळू घेऊन वाहन मालक महेश कुंभार (डांभूर्णी) हा जात होता. महसूल गस्तीपथकाचे प्रमुख तथा मंडळ अधिकारी सचिन जगताप, तलाठी मधुराजे पाटील, मिलिंद कुरकुरे, संजय दंडगोले हे पथक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी वाहनाची तपासणी करत त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला मात्र त्यांच्याकडे परवाना नव्हता. घटनास्थळी या वाहनाचा पंचनामा करण्यात आला व वाहन तलाठी शरीफ तडवी, गणेश वराडे, अमित राऊत, समीर तडवी, गणेश महाजन यांनी ताब्यात घेत यावल तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आले. वाहन मालकाला दंड संदर्भात नोटीस बजावण्यात आली. कारवाईमुळे अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.


कॉपी करू नका.