राहुल गांधींची जीभ छाटणार्यास जाहीर केले 11 लाखांचे बक्षीस : आमदार संजय गायकवाडांचे वादग्रस्त विधान

11 lakh reward announced for those who cut off Rahul Gandhi’s tongue: MLA Sanjay Gaikwad’s controversial statement मुंबई (16 सप्टेंबर 2024) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जो कुणी जीभ छाटून आणेल त्यास 11 लाखांचे बक्षीस देण्याचे घोषणा शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी केल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते प्रचंड संतापले आहेत.
काय म्हणाले संजय गायकवाड ?
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त करत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘जो कोणी राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देऊ’, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं.

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी संविधान धोक्यात असल्याचे सांगितले. अशी खोटी आख्यायिका पसरवून त्यांनी लोकांची मते घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत. आज ते मागासलेले आणि आदिवासींचे आरक्षण संपवण्याविषयी बोलत आहेत, असे गायकवाड म्हणाले.
मी म्हणतो, ‘जो कोणी राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देऊ’, राहुल गांधी यांना मागासलेले, आदिवासी आणि इतरांचे 100 टक्के आरक्षण संपवायचे आहे. आरक्षण संपवण्याची इच्छा त्यांच्या मनात आहे. आता काँग्रेसचा खरा चेहरा समोर आलाय, असे गायकवाड म्हणाले.
माझे हे विधान प्रसिद्धीसाठी नाही. मागासवर्गीय आणि ओबीसींची दुर्दशा आपण पाहत आहोत. आज आपण त्या समाजाला आपल्यासोबत आणण्याची गरज आहे. त्यांचा त्रास लक्षात घेऊन मी हे विधान केले आहे, असे गायकवाड म्हणाले.
https://x.com/ANI/status/1835593172044661156?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1835593172044661156%7Ctwgr%5E5cc560aeb92ecb5ac764a054f1f3b472b5c4082c%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fstate%2Fmaharashtra%2Fcm-shinde-group-shiv-sena-mla-sanjay-gaikwad-controversial-remark-on-rahul-gandhi-2833541.html
