इंदुरीकर महाराजांचा तरुणाईला सल्ला : दंगलीच्या भानगडीत पडू नका ; राजकारण्यांचेही टोचले कान!
Indurikar Maharaj’s advice to the youth: Don’t get caught up in riots; Politicians also pierced ears! अकोले (20 सप्टेंबर 2024) : प्रवचानाच्या व कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला ज्ञानाचे सल्ले देणार्या इंदुरीकर महाराजांनी आजच्या तरुणाईला दंगलीत पडू नका, असा सल्ला अकोलेतील किर्तनातून दिला आहे. धर्माच्या नावाखाली गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका, धर्मांचं भांडवल करू नका, असे सांगत त्यांनी राजकारण्यांचेही कान टोचले आहेत.
आमचा धर्म आमच्या हृदयात
इंदूरीकर महाराज म्हणाले, माझ्याएवढी किर्तने महाराष्ट्रात कोणी केली नसतील. महिन्यात 80 तरी किर्तने होतात. यातून आलेल्या अनुभवावरून सांगतो, तरुणांनो तुम्ही दंगलीच्या भानगडीत पडू नका. दंगलीत अडकला तर दहा वर्षे शिक्षा आहे. आतापर्यंत गरीबांचीच मुले दंगलीत अडकली आहेत. श्रीमंत आणि राजकारण्यांचे कोणी यात अडकत नाही. धर्माचा अभिमान नाही का? असे कुणी तुम्हाला विचारले तर त्याला सांगा तुमचा धर्म माईकवर आहे. आमचा धर्म आमच्या हृदयात आहे.

पुढार्यांच्या मागे फिरू नका
इंदूरीकर महाराज म्हणाले, धर्माच्या नावाखाली आमच्या गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका. दंगलीत अडकवून आमच्या पोरांचे करिअर उद्ध्वस्त करू नका, असे राजकारण्यांना सांगितले पाहिजे, असेही इंदुरीकर म्हणाले. तरुणांना सल्ला देताना ते म्हणाले, तुम्ही दंगलीत पडू नका. तुम्ही गरीब राहा, वेळ पडली तर घरोघरी फिरून कुल्फी विका, आणखी काही काम धंदा करा, या असल्या गोष्टींमध्ये पडू नका. 40 टक्के तरुण पुढार्यांच्या मागे फिरून भिकारी झाली आहेत.
राजकारण्यांवर निशाणा साधत इंदूरीकर महाराज म्हणाले, ज्यांनी आयुष्यभर पोरांचा वापर भोंगे बांधायला केला, ते नोकरी देऊ म्हणतात, पण देत नाहीत. केवळ वापरून सोडून देतात.




