भुसावळात आमदार प्रदीप परमार यांचे संविधानाची प्रत देवून स्वागत

0

भुसावळ (20 सप्टेंबर 2024) : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी गुजरात राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री प्रदीप परमार यांचे भुसावळ भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे यांच्यासह पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान भेट देऊन स्वागत करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सरचिटणीस संतोष ठोकळ, रवींद्र दाभाडे, उपाध्यक्ष दीपक सोनवणे, प्रेमचंद तायडे, नरेश खंडारे, विक्की गोहर, दिनेश बालूरे, रवींद्रनाथ खरात, संदीप शिंगारे, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रशांत निकम, जिल्हा उपाध्यक्ष धनराज बाविस्कर, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे, महिला मोर्चा शहराध्यक्षा अनिता आंबेकर, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष भावेश चौधरी, अनुसूचित जाती मोर्चा ग्रामीण मंडल अध्यक्ष योगेश जोहरे, दिलीप सुरवाडे, चेतन सावकारे, दर्शन चिंचोले, गोपीसिंग राजपूत, भाजपा मोर्चा,आघाडी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम करणार : आमदार
भारतीय जनता पार्टी भुसावळ ग्रामीणचा शक्ती केंद्रप्रमुख व बूथ प्रमुख यांचा मेळावा माळी भवनात झाला. मेळाव्यास उसळ विधानसभेचे आमदार तथा माजी मंत्री प्रदीप परमार हे उपस्थित होते. त्यांनी बुथ प्रमुखांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यात तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी भारतीय जनता पार्टी पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचे तन, मन, धनाने काम करू. असा शब्द कार्यकर्त्यांना त्यांनी दिला. प्रदीप परमार हे प्रत्येक बूथ वरती कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत तसेच युवा मोर्चा महिला आघाडी यांच्या सुद्धा भेटीत घेणार आहेत.


कॉपी करू नका.