राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत चाळीसगावचे चित्रकार कवी दिनेश चव्हाण प्रथम
चाळीसगाव (21 सप्टेंबर 2024) : भुसावळ शहरताील के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित स्व.बाबासाहेब के.नारखेडे स्मृती शिक्षकांसाठी कथालेखन स्पर्धेत चाळीसगाव येथील चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या ‘हे सारं तुमचंच देणं’ या कथेला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. शनिवार, 21 सप्टेंबर रोजी प्रभाकर हॉल, भुसावळ येथील बक्षीस वितरण समारंभात पुण्याचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे विज्ञान विभाग प्रमुख डॉ.दिलीप देशमुख, संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, पुस्तक, रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे हे 44 वे वर्ष होते.
दिनेश चव्हाण यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
या अगोदरही दिनेश चव्हाण यांनी काव्य लेखन स्पर्धेत सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या कलाकृतीही सर्वत्र झळकत असतात. साहित्य आणि कला असा दुहेरी संगम लाभलेल्या दिनेश चव्हाण यांच्या आता कथालेखनातील या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.





