अमळनेर शहरातील 28 वर्षीय महिलेची हत्या : शहरात खळबळ


Murder of 28-year-old woman in Amalner city : excitement in the city अमळनेर (22 सप्टेंबर 2024) : शहरातील 28 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. शीतल जय घोगले (28, रा.गांधलीपुरा, अमळनेर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अमळनेर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाकडून घटनेच्या कारणांचा शोध सुरू आहे.

शरीरावर आढळल्या मारहाणीच्या खूना
अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात राहणारी शीतल घोगले ही महिला मृत अवस्थेत त्यांच्या भागातील रिकाम्या जागेत पडलेली दिसून आली. तिला डोक्याला मार लागलेला होता तसेच तिच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण तर डोक्यावर व हातावर वार केलेला दिसून आला. हा खून नेमका कोणी आणि का केला? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

पोलीस अधिकार्‍यांची धाव
घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील, गणेश पाटील, सागर साळुंखे, निलेश मोरे, जितेंद्र निकुंभे, अमोल पाटील, सिद्धांत शिसोदे, स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रवी पाटील, दीपक माळी, संदीप पाटील यांनी पाहणी केली. दरम्यान महिलेचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी विविध दिशेने तपास चक्रे फिरवायला सुरुवात केली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !