चोरीच्या दोन दुचाकींसह मालेगावातील अट्टल चोरटे चाळीसगाव पोलिसांच्या जाळ्यात


Attal thieves of Malegaon with two stolen bikes in Chalisgaon police net चाळीसगाव (22 सप्टेंबर 2024) : मालेगाव येथील अट्टल दुचाकी चोरट्यांना चाळीसगाव शहर पोलिसांनी चोरीच्या दोन दुचाकींसह अटक केली आहे. उमर फारुख कलीम अहमद (20, गाँसे आझम नगर, मालेगाव) व मोहम्मद शोएब मोहम्मद ईलियास (23, सर्वे नं. 62, प्लॉट नं. 19, गौसे आझम नगर, मालेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

चाळीसगावातून लांबवली दुचाकी
चाळीसगावातील किराणा व्यावसायीक मुबशीर खान मेहमुद खान (27) यांची 65 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 ईसी 0582) सह 13 रोजी मध्यरात्री चाळीसगाव शहरातील घाट रोड, छाजेड ऑईल मिल परीसरातून चोरीला गेल्याने चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाळीसगाव शहर पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा माग काढत त्यांच्या मुसक्या बांधल्या व त्यांच्याकडून मुबशीर खान यांच्या दुचाकीसह चोरी करण्यासाठी वापरलेली 70 हजार रुपये किंमतीची होंडा दुचाकी जप्त केली. दोन्ही दुचाकींचे बाजारमूल्य एक लाख 35 हजार रुपये आहे. आरोपींकडील होंडा जप्त दुचाकी ही शांतीनगर पोलीस ठाणे, ठाणे शहर भागातून चोरल्याचे स्पष्ट झाले आहे.

यांनी केली कारवाई
जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात शोध पथकातील हवालदार राहुल सोनवणे, नाईक भूषण पाटील, नाईक महेंद्र पाटील, कॉन्स्टेबल विजय पाटील, कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटोळे, कॉन्स्टेबल आशुतोष सोनवणे, कॉन्स्टेबल रवींद्र बच्छे, कॉन्स्टेबल पवन पाटील, कॉन्स्टेबल राकेश महाजन, कॉन्स्टेबल नरेंद्र चौधरी यांच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !