अडावदला 35 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
A 35-year-old man was stoned to death in Adavad अडावद, ता.चोपडा (02 ऑक्टोबर 2024) : शहरात महिन्याभरात तिसर्यांदा खुनाची घटना समोर आल्याने नागरिक धास्तावले आहेत. शहरातील लोखंडे नगरातील बापू हरी महाजन उर्फ गरीब (35) या तरुणाची लाकडी दांडा व दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवार, 1 आक्टोंबर रोजी पहाटे सहा वाजता उघडकीस आली.
पोलिसांनी घेतली धाव
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात सतीश भोई, भरत नाईक, दिनेश चव्हाण, किरण शिरसाठ, शेखराव तोरे, संजय धनगर यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेच्या पंचनामा केला. घटनेतील मयत बापू महाजन हा बर्याच वर्षापासून अडावद येथे मामाच्या गावाला आई सोबत रहिवास करीत होता. तो विवाहित असून मजुरी करून गुजरान होता.
घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी भेट देत तपास तपासकामी अधिकार्यांना सूचना दिल्यात.

खुनाचे कारण अस्पष्ट : संशयीतांची चौकशी
याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला मयताचा मामा शांताराम पुना महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकर्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेच्या रात्री मयतासोबत असणार्या चौघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. मयताच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.
