काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या यावल शहराध्यक्षपदी रहेमान खाटीक
यावल- काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या यावल शहराध्यक्षपदी रहेमान गुलाम हुसेन खाटीक यांची निवड करण्यात आली. अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान यांनी एका पत्रकान्वये ही निवड केली. निवडीबद्दल खाटीक यांचे रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, जिल्हा परीषदेचे काँग्रेस गटनेते प्रभाकर सोनवणे, कादीर खान, अनिल जंजाळे, नईम शेख, शेख इम्रान, पहेलवान शेख मकसूद आदींनी अभिनंदन केले.