पुण्यासह मुंबई व पारोळा-भडगावातून दुचाकी चोरणार्यांना जळगाव गुन्हे शाखेकडून अटक
चोरी केलेल्या सहा दुचाकी जप्त : आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
Jalgaon crime branch arrested two-wheeler thieves from Mumbai and Parola-Bhadgaon along with Pune जळगाव (07 ऑक्टोबर 2024) : पुण्यासह मुंबई व पारोळा-भडगावातून सहा दुचाकींची चोरी करणार्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. रवींद्र उर्फ राहुल पाटील (21, पारोळा) व दीपक ज्ञानेश्वर पाटील (25, पारोळा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुन्हे शाखेला चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहिती काढून चोरीच्या दुचाककी पारोळा शहरातील दोन संशयित बाळगून असल्याची माहिती मिळताच त्यांच्या मुसक्या बांधल्या. आरोपींकडून एक लाख पाच हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकी जप्4त करण्यात आल्या. पारोळा व भडगावातील प्रत्येकीएक दुचाकी असून अन्य चार दुचाकी पुणे व मुंबई येथून चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, रणजीत जाधव, दीपक चौधरी आदींच्या पथकाने केली.
