आमदार दिलदार : भुसावळातील मराठा समाजाच्या सामाजिक सभागृहासाठी एक कोटींचा निधी

भुसावळात आमदार संजय सावकारे यांचा समाजबांधवांतर्फे सत्कार


MLA Dildar : Fund of one crore for social hall of Maratha community in Bhusawal भुसावळ (07 ऑक्टोबर 2024)  शहरातील मराठ समाजबांधवांसाठी जामनेर रोडवरील साईबाबा मंदिराजवळ असलेल्या जागेवर भव्य सभागृह बांधण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा रविवारी केल्यानंतर त्यांचा समाजबांधवांनी सत्कार केला. याप्रसंगी आमदारांनी शहराचा चौफेर विकास करण्याची ग्वाही देत विकासाची घौडदोड कायम सुरू राहणार असल्याची ग्वाही दिली.

शहरात उभारणार प्रशस्त सभागृह
शहरातील जामनेर रोडवरील आयटीआयजवळ मराठा समाजासाठी दोन एकर जागा आमदारांच्या प्रयत्नातून उपलब्ध करून देण्यात आली आहे व या जागेवर आता प्रशस्त सभागृह उभारण्यासाठी रविवारी आमदार संजय सावकारे यांनी एक कोटी रुपयांचा निधी दिल्याची घोषणा केली. याप्रसंगी समाजबांधवांनी टाळ्यांच्या कडकडाटात घोषणेचे स्वगत केले. याप्रसंगी समाजबांधवांनी आमदारांचा सत्कार केला.

यांची होती उपस्थिती
माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, मराठा समाज अध्यक्ष रवींद्र ढगे, माजी अध्यक्ष भागवत पाटील, मराठा समाजाचे माजी अध्यक्ष ललित मराठे, मराठा समाजाचे माजी अध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी अध्यक्ष रवींद्र लेकुरवाळे, राजश्री शाहू महाराज प्रतिष्ठानचे बाबा बावस्कर, बी.डी.पाटील, महेंद्र पाटील, डी.के.पाटील, अशोक पाटील, डी.एस.पाटील, आर.एन.पाटील, चंद्रकांत पाटील, नथू काळे, प्रकाश मोझे, प्रा.जयंत लेकुरवाळे, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.तुषार पाटील, साकेगाव सरपंच आनंदा ठाकरे, ज्ञानेश्वर आमले, हरीष पाटील, हॉटेल खालसा पंजाबचे संचालक सारंगधर पाटील आदींसह भुसावळ शहर व तालुक्यातील सर्व मराठा समाजबांधव उपस्थित होते.


कॉपी करू नका.