बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण : तीन आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक


Bopdev Ghat gang rape case: Three accused arrested by Pune police पुणे (11 ऑक्टोबर 2024) : मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीवर तिघांनी अत्याचार केला होता. ही घटना पुण्याजवळ कोंढवा परिसरातील सासवडच्या दिशेने जाणार्‍या बोपदेव घाटात घडली होती. रात्री फिरावयास गेली. त्यावेळी धारदार कोयत्याचा धाक दाखवून तीन जणांनी तिच्या मित्रास बांधून ठेवत तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. पुणे पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. दरम्यान, आरोपी पकडल्याबाबत पुणे पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

शस्त्र दाखवत केला अत्याचार
अमावस्येच्या दुसर्‍या दिवशी घाट परिसरात पुण्यात इव्हेंट मॅनेजमेंटच्या शिक्षणासाठी सुरत येथून आलेली 21 वर्षीय तरुणी तिच्या मित्रासोबत कोंढवा परिसरातील सासवडच्या दिशेने जाणार्‍या बोपदेव घाटात रात्री फिरावयास आल्यानंतर धारदार कोयत्याचा धाक दाखवून तीन जणांनी तिच्या मित्रास बांधून ठेवत तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याने समाजमन संतप्त झाले होते. पोलिसांनी या गुन्ह्या्चा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेची 30 पथके व इतर 30 पथके अशी एकूण 60 पथके कार्यरत केली. त्याशिवाय जुने पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची देखील मदत घेऊन त्यांना तपास कामात सक्रिय केले होते.

500 आरोपींची चौकशी
पोलिसांनी सुरुवातीला दोन दिवस तांत्रिक तपासावर भर देत सुमारे पाच हजार मोबाईलचा डम डाटा काढून त्याचे विश्लेषण केले. आरोपींची रेखाचित्र तयार करुन त्याद्वारे तपास करत संशयित 450 ते 500 सराईत आरोपींची चौकशी करण्यात आली. 125 ते 150 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. घटनास्थळ परिसरातील 20 किलोमीटर भागातील सर्व संशयित ठिकाणांची तपासणी करण्यात आली. जवळपासच्या 45 गावात पोलिस पथके जाऊन त्यांनी सराईत गुन्हेगारांकडे चौकशी केली. दरम्यान, याबाबत दिव्य मराठीने ऑनलाईन वृत्त दिले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !