महाराष्ट्रात निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी : 24 तासात आचारसंहिता जारी होण्याची शक्यता


मुंबई (14 ऑक्टोबर 2024) : महाराष्ट्रात आचारसंहिता कधीपासून लागणार ? याकडे नागरिकांचे लक्ष लागून असून 24 तासात अथवा 48 तासात आचारसंहिता लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेत निवडणूक तारखांची माहिती समोर येणार आहे.

सरकारने बोलावली मंत्री मंडळ बैठक
झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर सध्या सत्तेत असलेल्या महायुती सरकारने मंत्रिमंडळाची बैठक बोलावत त्यात अनेक निर्णय घेतले. महायुती सरकारची ही शेवटची मंत्री मंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. .


26 रोजी संपणार कार्यकाळ
महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्याआधी 288 मतदारसंघात निवडणुका होतील, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. महाराष्ट्र झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मंगळवारी केली जाऊ शकते. त्यामुळे 24 तासांनंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 288 जागांवर तर झारखंडमध्ये 81 जागांवर दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. 15 नोव्हेंबर रोजी मतदान होण्याची शक्यता आहे.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !