डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील डॉ.आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव (शनिवार, 18 जुलै 2026) : डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील फिजिओलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.आलोक कुमार यादव यांना दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (डीएमआयएचईआर), सावंगी (वर्धा) विद्यापीठामार्फत पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ.यादव यांनी पीजीआयएमईआर, चंदीगड येथून बीपीएचटी, जेएनएमसी, बेलगावी येथून एम.एस्सी. मेडिकल ही पदवी संपादन केली असून आता त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवून आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे.


त्यांनी प्रा. डॉ. तृप्ती श्रीवास्तव, प्राध्यापक, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, सावंगी (वर्धा) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले.दीर्घकालीन मूत्रपिंड विकार असलेल्या रुग्णांमध्ये पारंपारिक उपचारांच्या तुलनेत एरोबिक व्यायामाचा शारीरिक कार्यक्षमता, स्वायत्त मज्जासंस्थेची कार्ये, झोपेचा दर्जा, नैराश्य, चिंता, तणाव आणि इतर शारीरिक मापदंडांवर होणारा परिणाम एक यादृच्छिक नियंत्रित चाचणी असा होता.
या संशोधनामध्ये शारीरिक घटकांमध्ये होणार्या सकारात्मक बदलांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल व्यवस्थापन, सहकारी, विद्यार्थी व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.