निवडून येईल तेथे अपक्ष उमेदवार : जरांगे पाटलांचा निर्धार !


आंतरवाली सराटी (20 ऑक्टोबर 2024) : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आरक्षण न मिळाल्याने घोषणा केल्याप्रमाणे विधानसभेत उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला आहे. जिथे उमेदवार निवडणून येण्याची शक्यता आहे तिथेच आपले उमेदवार उभे करावा तसेच एससी आणि एसटीच्या जागा असलेल्या ठिकणी आपला उमेदवार द्यायचा नाही, असेही ते म्हणाले.

अंदाज घेवून उमेदवार ठरवार
जे कुणी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, त्या सर्वांनी अर्ज भरावेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी मतदारसंघांचा अंदाज घेऊन कोणाचा अर्ज ठेवायचा आणि कोणाचा मागे घ्यायचा याचा निर्णय देईल, असेही जरांगे म्हणाले आहेत. तसे न केल्यास मी त्या मतदारसंघात लक्ष घालणार नाही. आपल्या मागण्या मान्य असणार्‍यांना मतदान द्यायचे, असे जरांगे म्हणाले. वेळोवळी सूचना केल्या जातील, त्या पाळाव्यात. समीकरण जुळल्यानंतर पुढील मार्ग सोपा होईल, असेही जरांगे म्हणाले. 36 मतदारसंघांमध्ये मराठ्यांचे एक लाख मतदार असल्याचे जरांगे म्हणाले.

तर उमेदवारही पाडणार
जरांगे म्हणाले की, ज्या ठिकाणी निवडून येणार नाहीत, तिथे जो आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण करण्याबाबत बाँडवर लिहून देतील त्या उमेदवाराला निवडून द्यायचे अन्यथा सर्व पाडायचे, असे जरांगे म्हणाले. एससी आणि एसटीच्या जागांवर उमेदवार द्यायचे नाहीत, असेही जरांगेंनी सांगितले.

महायुती आणि महाविकास आघाडी सख्खे मावसभाऊ
महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघेही सख्खे मावसभाऊ आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. आपण उमेदवार उभे करायचे म्हटले तर महायुतीला आनंद होतो आणि पाडायचे म्हटले तर महाविकास आघाडीला आनंद होतो. यांच्या याद्या दिल्लीत पडून आहेत. पण त्यांचे आपल्याकडे लक्ष आहे, असे जरांगे म्हणाले.


कॉपी करू नका.