चोरीच्या दुचाकीसह संशयीत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात


जळगाव (20 ऑक्टोबर 2024) :गोपनीय माहितीवरुन तपासाचे चक्र फिरवित एमआयडीसी पोलिसांनी कठोरा येथून संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या. एक दुचाकी तालुका पोलीस ठाणे हद्दीतून तर दुसरी दुचाकी पुणे हद्दीतून चोरल्याची कबुली आरोपीने दिली. जीवन कोकुळ शिंदे असे संशयिताचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
कठोरा येथील तरुणाकडे चोरीची दुचाकी असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला रवाना केले होते. संशयिताकडे (दुचाकी क्रमांक एमएच 19 बीई 6230) तसेच (एम.एच.12 जी.एच.0897) अशा दोन दुचाकी पथकाच्या हाती लागल्या. जळगाव येथील दुचाकी शनिपेठेतील प्रशांत सानप यांच्या मालकीची असून ती आव्हाणे येथून चोरी करण्यात आली. संशयिताला तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, गणेश शिरसाळे, जमीर शेख, किशोर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नाना तायडे, गणेश ठाकरे, नितीन ठाकरे, किरण पाटील, विकास सातदीवे, योगेश बारी आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.