निवडणूक कर्मचार्‍यांच्या वाहनाला अपघात : चौघे जखमी


यावल (19 नोव्हेंबर 2024) :  किनगाव गावाजवळ निवडणुकीत प्रशासकीय कर्तव्यावर जाणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांचे वाहन अनियंत्रीत होवुन झालेल्या अपघातात चार महिला शिक्षीका व कर्मचारी जखमी झाल्या.

जखमी महिलांना उपचारासाठी चोपडा येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. किनगाव, तालुका यावल येथील कृषी उत्पन्न बाजारच्या उपकार्यालयासमोर सोमवार, 18 रोजी ज्योती भादले, मीनाक्षी सुलताने, आडगाव, तालुका यावल येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेवक कार्यरत असलेल्या कविता बाविस्कर व शिक्षिका लतीका परवीन तडवी या चोपडा येथे निवडणूक कर्तव्यावर रवाना झाल्या.

चारचाकी वाहन (क्रमांक एमएच 03 बिजे 8253) या वाहनास चोपडयाकडून रावेर येथे निवडणुकीच्या प्रशासकीय जातांना मंगळवा, 19 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास वाहनचालकाकडून ताबा सुटल्याने चारचाकी अनियंत्रीत झाल्याने अपघात घडला. त्यामुळे वाहनात बसलेल्या मिनाक्षी सुलताने, शिक्षीका ज्योती भादले, शिक्षीका लतिका परवीन तडवी व ग्रामसेविका कविता बाविस्कर या जखमी झाल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदती तत्काळ किनगाव येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथील पाठविण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !