पोलीस बंदोबस्तात प्रकृती अत्यवस्थ ; पीएसआय गोवर्धन केदार यांचा मृत्यू
जळगाव (16 डिसेंबर 2024) : शहरातील स्वामी नारायण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळयात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. याठिकाणी कर्तव्यात व्यस्त रामानंदनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गौतम सांडू केदार (वय 56,रा. पोलीस लाईन एए इमारत) यांना ह्दयविकाराचा झटका आला होता. उपचार घेत असताना त्यांचा रविवार, 15 रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.
पदोन्नतीवर नियुक्ती
रामानंदनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गौतम केदार यांची वर्षभरापूर्वी उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली होती. महामार्गलगत खेडी शिवारात स्वामी नारायण मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू आहे. याठिकाणी ते तीन दिवसांपासून बंदोबस्ताच्या कामात व्यस्त होते. कर्तव्यावर हजर असताना गुरुवार, 12 रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांना तत्काळ उपचारासाठी शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान रविवारी दुपारी त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यांच्याकडून उपचाराला प्रतिसाद न मिळू शकल्याने दुपारी 3.15 वाजता त्यांचा मृत्यू झाला. उपनिरीक्षक केदार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी तसेच वडील असा परिवार आहे.